मोदी-शाह तुम्ही जनरेशन झेडला धमकावून गप्प करू शकत नाही : राहुल गांधी

Foto
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या मकॉकरोच जनता पार्टीफच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कथितरित्या अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीवर दाखल झालेल्या पोलीस गुन्ह्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार मजनरेशन झेडफचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, गांधी यांनी पोस्ट केले की, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी कसे वागतात याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह - तुम्ही जनरेशन झेडला धमकावून गप्प करू शकत नाही. आधी तुम्ही त्यांची हाडे मोडली. आता तुम्ही एफआयआर दाखल करत आहात आणि त्यांची खाती नोंदवून घेत आहात. तुम्ही भारताचा भूतकाळ आहात. भारताच्या भविष्याशी कसे वागता याबद्दल सावधगिरी बाळगा, अशा शब्दात राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत मोदी शाहांवर सडकून प्रहार केला आहे. २३ जुलै रोजी जंतर मंतर येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल रुचिका सिंहवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की तिच्या वक्तव्याने पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेचा अपमान केला आहे आणि त्यामुळे अशांतता पसरून सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात एक झिरो एफआयआर नोंदवण्यात आला, जो नंतर पुढील कारवाईसाठी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीनेही या प्रकरणाविरोधात आवाज उठवला आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, रुचिकाचेवक्तव्य चुकीचे असू शकते, परंतु अशा प्रकारची कारवाई केली जाऊ नये यावर जोर दिला.

यंत्रणेचा वापर करणे पूर्णपणे अयोग्य
अर्थात, जर कोणतीही अपमानजनक भाषा वापरली गेली असेल, तर संबंधित व्यक्तीला त्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी मानहानी आणि फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, आंदोलकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी फौजदारी यंत्रणेचा वापर करणे अत्यंत निंदनीय आहे आणि केवळ कोणत्याही आक्षेपार्ह भाषेसाठी कोणालाही शिक्षा होऊ नये. मी असे म्हणत नाही की ती भाषा योग्य आहे, असे ते म्हणाले. मी तरुण पिढीतील प्रत्येकाला विनंती करेन की, त्यांनी आपल्या शब्दांबाबत आणि सर्वसामान्य लोकांविरुद्ध वापरल्या जाणार्‍या अपमानास्पद शब्दांबाबत खूप काळजी घ्यावी. त्याचबरोबर, यंत्रणेचा वापर करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, असे होता कामा नये. आम्ही पोलिसांनाही सांगू इच्छितो की त्यांनी शांतता राखावी आणि कोणत्याही राजकीय फायद्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये, असे दास पुढे म्हणाले.
दुसरीकडे, दिल्ली सरकारने सांगितले की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना वगळता, आंदोलनांच्या संबंधात अटक केलेल्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. आंदोलकांवर कोणतीही कारवाई न करणे ही सीजेपीच्या प्रमुख मागण्यांपैकी एक होती, जी ऑनलाइन प्लॅटफॉर्मने आपले आंदोलन मागे घेण्यापूर्वी सरकारने मान्य केली होती.